वॉरहेड नसलेल्या क्षेपणास्त्रामुळे जहाजाचं नुकसान झालं आहे, असं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. हे क्षेपणास्त्र ताशी 3000 किमी वेगाने जातं आणि हवाई संरक्षण यंत्रणेला ते रोखणं कठीण आहे. या क्षेपणास्त्रात वॉरहेड्स वापरल्या गेल्या असत्या तर काय परिणाम झाला असता, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. विध्वंसाचं चित्र आणखी वाईट असू शकलं असतं. (Image- ANI)
ब्रह्मोस एअरोस्पेस हा एक इंडो-रशियन संयुक्त प्रयत्न आहे. याच्याद्वारे सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रं पाणबुडी, जहाजं, विमानं किंवा लँड प्लॅटफॉर्मवरून सोडली जाऊ शकतात. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मॅक 2.8 च्या वेगाने किंवा आवाजाच्या जवळपास तिप्पट वेगाने उडते. (Image- Indian Airforce)