तुमचं एखाद्या मुलीवर प्रेम असेल आणि तिला भेटण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने भेट घ्यावी लागत असेल तर तुमच्यासाठी ती मोठी कसरत होते. दरम्यान असाच एक प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री गेला होता. यावेळी तो तिथे सापडल्याने त्याची चांगलीच तारांबळ उडाल्याची घटना समोर आली आहे.
तरुण रात्री तिच्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला. यादरम्यान रात्री ते एकमेकांना भेटले पण सकाळी अचानक मुलीच्या घरच्यांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी मिळून पंचायत बोलावून तरुणाचे मुलीशी लग्न लावून दिले.
हे संपूर्ण प्रकरण झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात घडले आहे. प्रियकर-प्रेयसीचे गावातील मंदिरात लग्न लावून देण्यात आले आहे. करीयतपूर येथे राहणारा 30 वर्षीय प्रियकर रणजीत कुमार याचे 22 वर्षीय नेहा कुमारी हिच्याशी प्रेमसंबंध होते. गेली 3 वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. यादरम्यान तो मुलगा चोरून काल रात्री मैत्रिणीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता.
मात्र, मुलगा आणि मुलीला घरच्यांनी पकडले. दोघेही वेगवेगळ्या जातीतले आहेत, पण लग्नाचा प्रस्ताव येताच दोघांनी होकार दिला. यानंतर दोघांनी गावातीलच मंदिरात लग्न केले. यावेळी उपस्थित लोकांनी दोघांना सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले.
यानंतर मुलीला मुलासह निरोप देण्यात आला. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे. त्याचवेळी ही बाब पोलिसांना कळवली, मात्र पंचायतीच्या निर्णयानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.