advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / अजगर चावला म्हणून असं करायचं? डॉक्टरांनाही घाम फुटला

अजगर चावला म्हणून असं करायचं? डॉक्टरांनाही घाम फुटला

श्यामलला आपण काहीतरी मऊ गिळगिळीत वस्तूवर उभं राहिलोय, असं जाणवलं. काही कळायच्या आतच त्याच्या पायाला अनेक ठिकाणी एकामागून एक जखमा झाल्या.

01
पश्चिम बंगालच्या फलकट्टा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात एक रुग्ण भलामोठा अजगर घेऊन आला आणि एकच खळबळ उडाली. 10 फूट लांबीचा हा महाकाय अजगर पाहून डॉक्टर आणि रुग्णांना धडकी भरली. नेमकं काय आहे प्रकरण पाहूया.

02
सातपुकुरिया परिसरात राहणारा श्यामल रॉय हा 30 वर्षीय तरुण मंगळवारी रात्री भाचा गौतम रॉय याच्यासह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाला होता. रस्त्यात ते एकाठिकाणी थांबले. त्यावेळी श्यामलला आपण काहीतरी मऊ गिळगिळीत वस्तूवर उभं राहिलोय, असं जाणवलं. काही कळायच्या आतच त्याच्या पायाला अनेक ठिकाणी एकामागून एक जखमा झाल्या. त्याने याबाबत भाच्याला सांगितलं आणि भाच्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

03
गौतम रॉयशी याबाबत चर्चा केली असता तो म्हणाला, 'गावात वीज नाहीये. त्यामुळे रस्त्यावरून चालताना समोर आलेली गोष्ट काय आहे कळत नाही. कशावर पाय पडला तेही कळत नाही. आम्ही दोघं चालत असताना रस्त्यात अजगर वेटोळा घालून झोपला होता. माझ्या काकांचा पाय नकळत त्याच्यावर पडला. पाय पडताच त्याने त्यांच्या पायाचा ठिकठिकाणी चावा घेतला. काकांना वेळेत रुग्णालयात घेऊन जाणं आवश्यक होतं, शिवाय हा अजगर साधा आहे की विषारी हे मला कळत नव्हतं, म्हणून मी त्याला एका गोणीत भरलं आणि आमच्यासोबत नेलं.

04
दोघं फलकट्टा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल झाले. गौतमने गोणीतून अजगर काढताच रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, रुग्ण सगळेच चक्रावले. रुग्णालय प्रशासनाने म्हटलं, 'अजगराला रुग्णालयात घेऊन येण्याची काहीच गरज नव्हती. त्याच्यामुळे कितीजणांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता याचा आपण विचारही करू शकत नाही.'

05
संपूर्ण प्रकरण लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला निसर्ग निरीक्षण केंद्रात दाखल केलं. तिथे त्याची तपासणी होऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील.

  • FIRST PUBLISHED :
  • पश्चिम बंगालच्या फलकट्टा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात एक रुग्ण भलामोठा अजगर घेऊन आला आणि एकच खळबळ उडाली. 10 फूट लांबीचा हा महाकाय अजगर पाहून डॉक्टर आणि रुग्णांना धडकी भरली. नेमकं काय आहे प्रकरण पाहूया.

    MORE
    GALLERIES