सुहानी तिच्या माइंड रिडिंगला चमत्कार वगैरे न म्हणता ही एक कला आणि मनोविज्ञान असल्याचं सांगते. सुहानीची माइंडकेअर नावाची संस्था असून ती मानसिक थेरपीसुद्धा देते.
बागेश्वर नाथ धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या देशभरात चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्रींना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा केल्या जात आहेत. त्यातच सुहानी शाह हिचं नावही घेतलं जात आहे.
2/ 10
सुहानी शाह ही माइंड रिडर आहे. सोशल मीडियावर ती चित्रपट कलाकार आणि दिग्गजांसोबत याआधी दिसली आहे. तसंच सध्या अनेक चॅनेल्सवरही ती माइंड रिड करताना दिसते.
3/ 10
समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे ओळखणारी सुहानी पहिलीनंतर पुढे शाळेत गेलीच नाही. आपण माइंड रिडर असल्याचं सांगणाऱ्या सुहानीने वयाच्या सातव्या वर्षी स्टेज शो केला होता.
4/ 10
लहानपणापासूनच जादूहार व्हायचं असं तिचं स्वप्न होतं. वयाच्या पाचव्या वर्षी सुहानीने जादू शिकायला सुरुवात केली. पहिल्या शोनंतरच ती माइंड रिडिंगमध्येही सक्रीय झाली होती.
5/ 10
सुहानी फक्त माइंड रिडरच नव्हे तर कार्पोरेट ट्रेनर, लाइफ कोच, तसंच हिप्नोथेरपिस्टसुद्धा आहे. यावर तिने पाच पुस्तकं लिहिली आहेत. गेल्या दोन दशकांपासून जगभरात तिने यानिमित्ताने प्रवास केला आहे.
6/ 10
सुहानी तिच्या माइंड रिडिंगला चमत्कार वगैरे न म्हणता ही एक कला आणि मनोविज्ञान असल्याचं सांगते. सुहानीची माइंडकेअर नावाची संस्था असून ती मानसिक थेरपीसुद्धा देते.
7/ 10
धीरेंद्र शास्त्रीबाबत विचारले असता तिने म्हटलं की, ते माइंड रिडर असू शकतात किंवा नसतीलही. त्यांनी खरंच लोकांच्या मनातलं ओळखलं की त्यांचीच माणसे लोकांमध्ये बसवली होती हे सांगणं कठीण आहे.
8/ 10
माइंड रिडिंगच्या वैज्ञानिक पद्धती असतात, त्यांचा वापर केल्यानंतर असं वाटतं की चमत्कार केला जात आहे. पण लोकांनी तो चमत्कार मानू नये. लोक चमत्कार मानतात आणि पुन्हा अंधविश्वास ठेवतात असं सुहानी म्हणते.
9/ 10
राजस्थनामधल्या उदयपूरची असलेल्या सुहानीला अभ्यासात फारसा रस नव्हता. त्यामुळे शिक्षण बंद करून तिने जादूचे प्रयोग शिकायला लागली आणि ते करू लागली. यासोबतच तिने मेंटलिझमचा अभ्याससुद्धा केला.
10/ 10
सुहानी सोशल मीडियावर सक्रीय असून ती २००७ पासून युट्यूब चॅनेल चालवते. याशिवाय ट्विटर, इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स आहेत. करीना कपूर, जाकिर खान, सायना नेहवाल आणि संदीप माहेश्वरी यांच्यासोबत तिने शो केले आहेत.