रामलल्लांच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अयोध्या विमानतळ, ज्याला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं म्हटलं जातं, ते देश-विदेशातील भक्तांच्या आगमनासाठी सज्ज झालं आहे.
हे दृश्य आहे राम मंदिराच्या गाभाऱ्याचं. याठिकाणी श्रीरामांचा जन्म झाला, असं मानलं जातं. राजस्थानहून आणलेल्या पांढऱ्या मार्बलने गाभाऱ्याच्या चहूबाजूंना आकर्षित नक्षीकाम करण्यात आलं आहे.
हा आहे 'परिक्रमा पथ'. राम मंदिरातील गाभाऱ्याच्या चारही बाजूंना एक मार्ग तयार करण्यात आला आहे. याद्वारे भक्त श्रीरामांचं परिक्रमण करू शकतील. म्हणूनच या मार्गाला परिक्रमा पथ असं नाव दिलंय.
राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी तीन मार्ग असतील. त्यापैकीच हा एक मार्ग. दगडांनी उभारलेल्या या मार्गावर अतिशय सुरेख असं नक्षीकाम करण्यात आलं आहे.
राम मंदिर बांधकामात वापरलं जाणारं हे सागवानाचं लाकूड महाराष्ट्रातून आणण्यात आलं आहे. 1000 वर्ष टिकणाऱ्या या लाकडामुळे राम मंदिरही वर्षानुवर्षे भक्कम स्थितीत राहील.