Kasol's Free Kasol Cafe: काही भारतीयांनी केवळ भारतीय असल्यामुळे त्यांना येथे जाण्यास मज्जाव केल्याची माहिती दिल्यानंतर या कॅफेची चर्चा सुरू झाली. याच्या मालकानं हे नाकारलं असलं तरी एका मुलीने कॅफेने तिला मेनू कार्ड देण्यास नकार दिल्याचं तिच्या शेजारी उभ्या असलेल्या ब्रिटीशांना दिल्याचे सांगितलं. असं म्हटलं जातं की, एकदा काही भारतीय कॅफेमध्ये गोंधळ घालून गेले होते. त्यांनी येथील महिला मालकाशी गैरवर्तन केलं होतं. तेव्हापासून इथे भारतीयांना बंदी आहे.
Broadlands Hotel in Chennai : चेन्नईतील या हॉटेलमध्ये (चेन्नईतील ब्रॉडलँड्स हॉटेल) केवळ परदेशी पासपोर्टधारकच राहू शकतात. काही खोल्या भारतीयांसाठी आहेत. पण त्या तेव्हाच मिळतात, जेव्हा परदेशी पर्यटक कमी येतात. एका ऑनलाईन हॉटेल बुकिंग साईटने हीच गोष्ट उघड केली आहे, ज्यात असं लिहिलं आहे की, ऑनलाईन आरक्षण करूनही भारतीयांना हॉटेलमध्ये कसं राहू दिलं जात नाही.
Foreigners Only Beach of Goa : गोव्यातील अनेक बीचवर फक्त परदेशी लोकांनाच परवानगी (फॉरेनर्स ओन्ली बीच ऑफ गोवा) आहे. येथे पाहुणे आरामात बिकिनी आणि काही ठिकाणी नग्न होऊन फिरू शकतात. अशा ठिकाणी भारतीयांना प्रवेश दिला जात नाही. याचं कारण स्पष्ट आहे. अशी संस्कृती भारतीय जनता अजून स्वीकारू शकलेली नाही. त्यामुळे अशा वातावरणात भारतीय लोकांच्या काही विचित्र प्रतिक्रियांमुळे इतरांना त्रास होणार आहे. त्यामुळे भारतीयांना या समुद्रकिनाऱ्यांवर जाता येत नाही.