नागपुरात मनोरुग्ण अडकला पुरात, तीन तासांच्या थरारानंतर SDRF कडून सुटका, पाहा Photos
नागपूरमधील हिंगणा या ठिकाणी असणाऱ्या राधाकृष्ण मंदिरात एक वेडसर इसम पुराच्या पाण्यात अडकून पडला होता. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात SDRF ला यश आलं.
नागपूर जिल्ह्यात दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे वेणा नदीला पूर आला आहे. हिंगणा येथील नदीच्या मधोमध राधाकृष्ण मंदिर आहे. या मंदिरात एक वेडसर इसम झोपला होता.
2/ 7
मंदिराच्या सभोवताली पुराचे पाण्याचा वेढा पडल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. पोलिसांनी एसआरडीएफ पथकाला याची माहिती दिली.
3/ 7
दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुटकेचं हे थरारनाट्य चाललं. या बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने अडकलेल्या व्यक्तीला पुराच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढलं.
4/ 7
50 वर्षीय मुन्ना गुलाब बानिया हा मानसिक रुग्ण आहे. नेहमीप्रमाणे घरून दुपारी बारा वाजता जेवण केल्यानंतर हा विश्राम करण्याच्या हेतूने वेणा नदीपात्रातील राधाकृष्ण मंदिरात गेला.
5/ 7
या ठिकाणी तो निवांत झोपला. दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाला दमदार सुरुवात झाली. पाहता-पाहता दोन तासातच वेणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले.
6/ 7
राधाकृष्ण मंदिर वेणा नदीच्या पात्रात मधोमध असल्याने या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे या व्यक्तीला बाहेर पडता येईना.
7/ 7
या मंदिरात असणारे इतर सर्वजण परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच बाहेर पडले होते. मात्र हा इसम झोपून राहिल्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही.