कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर ड्रग्ज तस्कराकडून १ किलो गांजा जप्त केला आहे. आता मुंबई विमानतळावर पोलिसांनी एक किलो गांजासह एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर एकाची तपासणी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या लाल मिर्चीच्या पाकिटात गांजा सापडला. मिर्चीची पाकिटे अमेरिकेतून आली होती. कस्टम विभागाला संशय येताच तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गांजा आढळला. मुंबईत कस्टम विभागाकडून विमानतळावर कडक तपासणी केली जाते. यामध्ये अनेकदा विविध पद्धतीने अंमली पदार्थ किंवा तस्करी करण्यात आलेले साहित्य आणले जाते.