मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. बोरीवली स्थानकात ही घटना घडली.
लोकलमध्ये आग लागल्याची घटना लक्षात येताच बोरीवली स्टेशनवर ट्रेन थांबवण्यात आली. यानंतर प्रवाशी खाली उतरले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाला. पावसामुळे पेंटाग्राफमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. चर्चगेटवरून विरारच्या दिशेने लोकल जात असताना ही घटना घडली.