जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यात मोठी दरी आहे. कुणाकडे अफाट संपत्ती आहे, तर कुणाला दोन वेळच्या भाकरीसाठी तरसावं लागतं. जगातील अनेक देश खूप श्रीमंत आहेत, तर काही देशांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आज आपण अशा देशाविषयी जाणून घेणार आहोत जे खूप श्रीमंत आहेत.
2023 च्या श्रीमंत देशांच्या यादीत आयर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. हा छोटा देश 2023 मध्ये जगातील सर्वात समृद्ध देश बनला. कमी लोकसंख्या आणि आर्थिक स्थैर्य या देशाने हे यश संपादन केलंय. जगातील अनेक महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध संस्थांनी या देशात गुंतवणूक केली आहे.
2023 च्या श्रीमंत देशांच्या या महत्त्वाच्या यादीतील पुढचा देश म्हणजे लक्झेंबर्ग. हा देश आयर्लंडच्या अगदी थोड्या फरकाने मागे आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश आयर्लंडच्या पुढे आहे. या देशातील वार्षिक सरासरी दरडोई उत्पन्न 73 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे एक व्यक्ती रोज 20,000 कमावते.
2023 च्या श्रीमंत देशांच्या यादीत पुढचा नंबर सिंगापूरचा आहे. या बेट देशाची लोकसंख्या सुमारे 59 लाख 81 हजार आहे. अनेक वर्षांपासून हा देश गुंतवणूक आणि व्यापारासाठी प्रमुख ठिकाण आहे. येथील सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न 53 लाख रुपये आहे. म्हणजेच येथे दररोज एक व्यक्ती 14 हजार रुपयांहून अधिक कमावते.
2023 च्या श्रीमंत देशांच्या यादीत आखाती देश कतारचे नाव देखील आहे. 0.855 ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या आधारे संयुक्त राष्ट्रांनी कतारला उच्च विकसित अर्थव्यवस्था म्हटले आहे. या देशातील वार्षिक दरडोई उत्पन्न 62,310 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 51 लाख रुपये आहे. तेल आणि वायूचा मोठा साठा या देशाची महत्त्वाची संपत्ती आहे.
2023 च्या श्रीमंत देशांमध्ये नॉर्वेचाही समावेश आहे. या युरोपीय देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे आणि GDP सुमारे 82,000 डॉलर पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, या देशातील सरासरी वार्षिक उत्पन्न 84,000 डॉलर म्हणजेच 69 लाख रुपये आहे. विशेष बाब म्हणजे नॉर्वे अनेक वर्षांपासून या यादीत आहे.