ब्लूफिन टूना हा जगातील सर्वात महाग मासा म्हणून ओळखला जातो. हा मासा ट्यूना प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे. त्याचा पाण्यात पोहण्याचा वेग अतिशय वेगवान आहे.
हा मासा 3 मीटर लांब आणि 250 किलो वजनाचा असू शकतो. तो इतर लहान माशांना आपला शिकार बनवतो. हा मासा उष्ण रक्ताचा असतो. प्रोटीन आणि ओमेगा-3 ने भरपूर असलेला हा मासा औषधी बनवण्यासाठीही वापरला जातो.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जपानमधील टोकियोच्या टोयोसू फिश मार्केटमध्ये जायंट ब्लूफिन टूना खरेदी करण्यासाठी 273,000 डॉलर म्हणजेच 2 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. या ब्लूफिन ट्यूनाचे वजन 212 किलो होते.
ब्लूफिन टूना त्याच्या वेगासाठी आणि समुद्रात खोलवर जाण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. या माशाचे वय सुमारे 40 वर्षे असते.
नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने ब्लूफिन ट्यूनाच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. पकडल्यास तुरुंगवास तसेच दंडही होऊ शकतो.