कडक उष्णता आणि आर्द्रतेमध्ये AC हा झटपट आराम देतो. अशा वेळी घर, ऑफिस, मॉल सर्वत्र एसीचा वापर होतो. मात्र, घरी एसी चालवणाऱ्या बहुतांश लोकांना तो कोणत्या तापमानात चालवावा हे माहीत नसते.
काही काळापूर्वी, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) ने एसी मॅन्युफॅक्चरर्ससाठी एअर कंडिशनरसाठी डिफॉल्ट तापमान 24 अंश सेल्सिअस असणे बंधनकारक केले होते. पूर्वी एसीमध्ये डीफॉल्ट तापमान 20 अंश ठेवले जात होते.
अनेक स्टडीमध्ये समोर आलेय की, प्रत्येक डिग्रीसाठी 6 टक्के विजेची बचत होते. एसी जितका कमी तापमानात चालेल तितका कॉम्प्रेसर जास्त काम करेल आणि विजेचे बिल जास्त येईल.
रुम लवकर थंड व्हावी म्हणून एसी किमान 18 अंशांवर चालवण्याची बहुतेक लोकांची सवय असते. पण, 24 अंशांवर एसी चालवणे हा उत्तम पर्याय आहे.
कारण, मानवी शरीराचे सरासरी तापमान 36 ते 37 अंश असते. म्हणजेच, यापेक्षा कमी तापमान आपल्यासाठी नैसर्गिकरित्या थंड असेल आणि 24 अंश आपल्याला आराम देण्यासाठी पुरेसे असेल. डॉक्टर मानतात की मानवी शरीरासाठी 24 अंश पुरेसे आहे.
आपण एसी 24 अंशांऐवजी 18 वर सेट केला, तर खोली 18 अंशांवर थंड झाल्यानंतरच कंप्रेसर काम करणे थांबवेल आणि विज वापरली जाईल. अशा वेळी जर आपण 24 अंशांवर एसी चालवण्याची सवय लावली तर आपण 6 X 6 = 36 टक्के विजेची बचत करू शकतो.