फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वात सोपा आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. यामध्ये, गुंतवणूकदाराला ठराविक अंतराने निश्चित परतावा मिळण्याची हमी असते. तसेच बाजारातील चढ-उताराचाही त्यावर कोणताही परिणाम होत नाही. एफडीशी संबंधित वेगवेगळे नियम आहेत, जे बँकांवर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे सर्व बँकांचे किमान आणि कमाल कालावधी किंवा ठेव रकमेबाबत समान नियम असतात.