1.1 टक्के अधिभार लावण्याची शिफारस :NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकात 1 एप्रिलपासून 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के अधिभार लावण्याची शिफारस केली आहे. हे चार्ज मर्चेंट ट्रांझेक्शन म्हणजेच व्यापाऱ्यांना पैसे देणाऱ्या ग्राहकांना द्यावे लागेल. वॉलेट किंवा कार्डद्वारे केलेले व्यवहार पीपीआयमध्ये येतात. इंटरचेंज फी सहसा कार्ड पेमेंटशी संबंधित असते. व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी हे चार्ज आकारले जाते.
डिजिटल पद्धतीने पेमेंट करणे महागणार: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) कडून असे सांगण्यात आले की, 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्याची समिक्षा केली जाईल. NPCI च्या परिपत्रकानुसार, 1 एप्रिलपासून, Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या डिजिटल मोडद्वारे पेमेंट करणे महाग होईल. जर तुम्ही 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरले तर तुम्हाला त्याऐवजी जास्त पैसे द्यावे लागतील.