कडक उन्हात AC शिवाय तर जमतच नाही. परंतु असे बरेच लोक फक्त कूलर किंवा फॅननेच काम चालवतात. अनेकदा आपण पाहतो की फूल पाणी असुनही कूलर गरम हवा फेकतं. पण आज आपण अशा काही ट्रिक पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचा कूलर थंडगार हवा देईल.
आज आम्ही तुम्हाला अशा काही जुगाडविषयी सांगणार आहोत, ते करून पाहिले तर तुम्हाला एसीप्रमाणे गारवा जाणवेल.
कूलर कधीही बंद खोलीत ठेवू नका. त्याच्या हवेचे योग्य प्रकारे सर्कूलेशन होत नाही आणि खोली गरम आणि चिकट राहते. एसीला पूर्ण पॅक रूमची आवश्यकता असते, त्याच्या अगदी उलट, कूलरला वेंटिलेशन असलेल्या खोलीची आवश्यकता असते. जर हवेशीर खोलीत कूलर लावला असेल तर तो खोली पूर्णपणे थंड करेल.
खोलीत कूलर ठेवणे टाळा. जर तुम्ही कूलर खोलीत ठेवून चालवत असाल तर तुमच्या खोलीतील हवा सतत फिरत राहते आणि तुमच्या कूलरमध्ये गरम हवा वाहते. म्हणून, कूलर उघड्या खिडकी किंवा दरवाजाजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते बाहेरून हवा खेचून खोलीत थंड हवा देईल.
कूलरमधील गवताचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुमचे गवत जुने झाले असेल तर त्यामध्ये धूळ साचली असेल, त्यामुळे वेळोवेळी ते साफ करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ते खूप खराब आहे, तर ते बदला.
कूलरमध्ये पाण्याचीही महत्त्वाची भूमिका असते. कुलरमध्ये पाणी भरताना विशेष लक्ष द्यावे लागेल. उन्हाळ्यात घरातील टाकीतील पाणीही गरम होते आणि अशा वेळी कूलरमध्ये गरम पाणी भरले तर कूलर थंड हवा देत नाही. जर तुम्ही कूलरच्या टाकीत बर्फाचे पाणी किंवा बर्फाचा तुकडा ठेवला तर ते खूप थंड हवा देईल.