शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने (Modi Government) काही योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान यापैकी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan samman nidhi) आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.
अशा शेतकऱ्यांची नावं लाभार्थ्यांच्या यादीमधून देखील हटवण्यात आली आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले असतील त्यांना ते परत करावे लागत आहेत. केंद्राने काही निश्चित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सांगितले आहे. तरी देखील त्यांनी लाभ घेतला असल्यास सरकार त्यांच्याकडून वसुली करत आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचा लाभ- 1)तुमच्या नावावर शेत नसेल तर: पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शेती करत असेल पण त्याच्या नावावर शेत नसेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शेत त्या शेतकऱ्याचे वडील किंवा आजोबांच्या नावे असेल तरी देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2)या शेतकऱ्यांना मिळणार नाही फायदा: जर एखादा शेतकरी त्या जमिनीचा मालक आहे पण तो सरकारी कर्मचारी आहे किंवा निवृत्त झाला आहे तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिवाय आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांना देखील PM शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंटना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ- या मार्गदर्शक तत्वांनुसार लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांना लाभ मिळेल. यामध्ये असे कुटुंब परिभाषित केले आहे ज्यात पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलं एकत्रितपणे दोन हेक्टर किंवा त्याहून कमी क्षेत्राची, संबंधित राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाच्या भूमी अभिलेखानुसार शेती करतात.