काय आहे अहवालामध्ये?- SBI चा रिसर्च रिपोर्ट इकोरॅप (Ecowrap) मध्ये असं म्हटलं आहे की, 'दुसऱ्या तिमाहीनंतर आरबीआय आणि बाजारांच्या सुधारित अंदाजानंतर आमचा असा अंदाज आहे की संपूर्ण वर्षासाठी (आर्थिक वर्ष 2020-21) जीडीपीमध्ये घसरण 7..4 टक्के असेल. (आमचे पूर्वानुमान उणे 10.9 टक्के होते, त्या तुलनेत)
ग्लोबल रेटिंग एजन्सी एस अँड पी (S&P Global) रेटिंगने मंगळवारी चालू आर्थिक वर्ष 2021 साठी भारतात वाढीचा अंदाज (-) 9 टक्के वरून (-) 7.7 असेल, असे नमुद केले होते. S&P ने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वाढणारी मागणी आणि कोरोना संक्रमणाची कमी होणारी संख्या यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा कोरोनाचा परिणाम याबाबत आमचा अंदाज बदलला आहे. S&P ने मार्त 2021 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी जीडीपी ग्रोथ उणे 9 असेल असा अंदाज व्यक्त केला होता, त्यात सुधारणा करून आता उणे 7.7 टक्के केला आहे.