मार्च महिन्यातच सर्व अकाउंटचा हिशोब केला जातो. नंतर ते क्लोज केले जाते. अशा परिस्थितीत रविवारी सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयकडून देण्यात आल्या आहेत. 31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बँकांमध्ये क्लोजिंगचे काम केले जाते. यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी शाखा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरबीआयचे निर्देश काय? : केंद्रीय बँकांच्या पत्रात म्हटले की, 'सर्व एजेन्सी बँकांना 31 मार्च, 2023 ला सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी व्यवहारांशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी आपल्या नियुक्त शाखा खुल्या ठेवायला हव्यात.' पुढे त्यांनी सांगितले की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीमद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत व्यवहार सुरू राहतील. तसेच, 31 मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम विभाग, आरबीआय आवश्यक सूचना जारी करेल.