कोरोनानंतर अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. देशात पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते. भलेही पाम तेल सोया आणि सूर्यफुलापेक्षा स्वस्त असेल पण तरीही त्याच्या किंमती गगनला भिडण्याची शक्यता आहे.
2/ 6
गेल्या चार वर्षात पेम तेलाचे मूल्य वाढत चाललं आहे. पाम तेलाचे आयात मूल्य उच्च स्तरावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर पाम तेलाला सोन्याचा भाव येण्याची शक्यता आहे.
3/ 6
स्थानिक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आयात शुल्क वाढवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. लवकरच याबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे.
4/ 6
2022-2023 मध्ये पाम तेलाची आयात चार वर्षातील सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. 91.7 लाख टन पोहोचण्यावर शक्यता आहे.
5/ 6
भारतात सध्या पाम तेलावरील आयात शुल्क वाढवण्याबाबत विचार करत आहे. त्यामुळे येत्या काळात महागाईचा तडका आणखी तीव्र लागणार असल्याचं दिसत आहे. अनेक नमकीन प्रोडक्टसाठी पामतेलाचा वापर केला जातो. त्यामुळे त्या वस्तू देखील महाग होण्याची शक्यता आहे.
6/ 6
सोया तेल आणि सूर्यफुलाला पाम तेल स्पर्धक होणार काय अशी आता शंका निर्माण होत आहे. पाम तेल वापरणाऱ्यांना आता खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागू शकतो.