देशातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत पत्र योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अकाउंट उघडून तुम्ही मदर्स डेच्या खास प्रसंगी तुमच्या आईला गिफ्ट देऊ शकता.
देशातील प्रत्येक महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते आणि यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
योजनेवर मिळालेल्या व्याजाबद्दल बोलायचं झालं तर ते 7.5 टक्के आहे. तुम्ही तुमच्या आईसाठी मे 2023 मध्ये या योजनेत अकाउंट उघडले तर योजनेची मॅच्युरिटी मे 2025 मध्ये होईल.
या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत अकाउंट उघडू शकता. नुकतंच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसद मार्गावरील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजनेअंतर्गत खाते उघडले आहे.