Most Expensive Currency: सर्वात महागड्या करन्सीच्या बाबतीत कोणत्याही पाश्चिमात्य देशांच्या पुढे आखाती प्रदेश आहे. त्यांची करन्सी मजबूत असण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याकडे कच्चं तेल आणि नॅचरल गॅसचे नैसर्गिक भंडार आहे. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या करन्सीविषयी ज्यांच्यासमोर डॉलर आणि पौंडही काहीच नाही.
कुवैती दिनार ही जगातील सर्वात महाग करन्सी आहे. त्याचे मूल्य समजून घेण्यासाठी ते रुपयाच्या दृष्टीने समजून घ्यावे लागेल. आता 1 कुवैती दिनारमध्ये सुमारे 267 रुपये खरेदी करता येतात. हा एक्सचेंज रेट सतत बदलत राहतो. त्याची डॉलरशी तुलना केली तर 1 कुवैती दिनारमध्ये तुम्ही 3.25 डॉलर खरेदी करू शकता. कुवेत हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. येथील दुसरा सर्वात मोठा उद्योग स्टील मॅन्युफॅक्चरिंगचा आहे. कुवेतच्या जीडीपीपैकी अर्धा भाग तेलावर आधारित आहे.
या लिस्टमध्ये बहरीनी दिनार दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका बहरीनी दिनारमधून 217 रुपये आणि 2.65 डॉलर्स खरेदी करता येतात. येथील अर्थव्यवस्थाही तेल आणि गॅसवर अवलंबून आहे. याशिवाय बँकिंग सेवेसाठीही ओळखले जाते. मात्र, सरकारचा सर्वाधिक 85 टक्के महसूल केवळ तेलातून येतो.
या लिस्टमध्ये ओमानी रियाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा एक आखाती प्रदेश आणि पश्चिम आशियाचा भाग देखील आहे. येथील अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलावर आधारित आहे. सरकारचा 85 टक्के महसूल फक्त तेल आणि वायूमधून येतो. 1 ओमानी रियालमध्ये 214 रुपये आणि 2.60 डॉलर्स खरेदी करता येतात.
जॉर्डन दिनार ही जगातील चौथ्या क्रमांकाची महागडी करन्सी आहे. पश्चिम आशियामध्ये एक देश आहे जो जॉर्डन नदीच्या काठावर वसलेला आहे. मात्र, हा देश आर्थिकदृष्ट्या तेवढा मजबूत नाही. याला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून बरीच मदत मिळते. यासोबतच जगभरात पसरलेले जॉर्डनचे लोक इथल्या फॉरेन एक्सचेंजच्या प्रवाहात मदत करतात. ट्रेड आणि फायनान्स हे येथील उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. 1 जॉर्डनियन दिनारमध्ये 115.52 रुपये खरेदी करता येतात.
पाचव्या स्थानावर पौंड स्टरलिंग आहे. ही यूकेची करन्सी आहे. यूके युरोपियन खंडात स्थित आहे. त्यात एकूण 4 देश आहेत. इंग्लंड, नॉर्थन आयर्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड. 1 यूके पौंड स्टर्लिंगमध्ये 102 रुपये खरेदी करता येतात. यूके ही 4 देशांची राजकीय संघटना म्हणून समजली जाऊ शकते ज्यावर इंग्लंडचा राजा राज्य करतो. यूकेच्या कमाईचा मुख्य स्त्रोत हा सेवा क्षेत्र आहे. ज्यामध्ये फायनान्स, रिटेल, मनोरंजन आणि पर्यटनाचा समावेश आहे.