व्हॅलेंटाइन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा साजरा करण्याचा दिवस, मग या दिवशी आपल्या आपल्या परीने प्रिया व्यक्तीला गिफ्ट दिलं जातं मग आता तुमच्या आईला किंवा बायकोला किंवा तुम्ही स्वत:ला घराचं गिफ्ट देऊ शकता. म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करून तुमचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.
तुम्हाला तुमच्या हक्काचं घर घ्यायचं असेल तर उशीर करू नका. कारण तुमच्याकडे फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर आता करू शकता.
म्हाडाने नागपूर, पुणे आणि मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघाली आहे. तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही म्हाडाच्या ऑफिशियल साईट वर जाऊन अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी तर पेमेंट करण्याची अंतिम मुदत 6 फेब्रुवारी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर आता तुमच्याकडे 3 दिवस शिल्लक आहेत.
17 फेब्रुवारी रोजी लॉटरी निघणार आहे. ज्यांना घर लागलं नाही त्यांचे पैसे 2 दिवसांनंतर पुन्हा खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल.
तुम्हाला रजिस्ट्रेशन करतानाच 7 कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाणार असून पुढे लॉटरीची प्रक्रिया करण्यात येईल. यावेळी 7 कागदपत्र जमा करायची असल्याने प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.
यंदाच्या लॉटरीमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी अनेक नियम बदलण्यात आले आहेत. हे बदलेले नियम तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवर याशिवाय न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर देखील वाचायला मिळू शकतात. त्यासाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरु नका.