आरबीआय लवकरच पेनल्टी चार्जेस संबंधित नवीन नियम जारी करणार आहे. प्री-पेमेंट चार्जेस आणि क्लोजर चार्जेसचेही नियम असतील. आरबीआयला नवीन नियमांद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यायचा आहे. यापूर्वीही याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. यासंबंधीची माहिती लवकरच आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.