ज्यावेळी बँका स्वत: ग्राहकाशी संपर्क साधून कर्ज देतात, तेव्हा अशा कर्जांना प्री- अप्रूव्ड लोन म्हणतात. तुम्हालाही अशा प्रकारच्या कर्जाच्या ऑफर अनेकदा आल्या असतील.
अशा कर्जाच्या ऑफर ग्राहकांनी स्वीकारल्या पाहिजेत की नाही, असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण होत असेल. यासोबतच ते नियमित कर्जापेक्षा वेगळे कसे आहे. याविषयीच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
प्री-अप्रूव्ड लोनमध्ये बँक कर्जदाराची आर्थिक स्थिती आणि क्रेडिबिलिटी याबद्दल बँकांना अनेकदा माहिती असते. ग्राहकाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बँक काही महत्त्वाची कागदपत्रे पाहते.
यासाठी बँका इनकम टॅक्स रिटर्न आणि लेटेस्ट इनकम प्रूफ चेक करण्याची मागणी करू शकतात. हे कर्ज मुख्यतः त्या बँकांमधून मिळते जिथे तुमचे खाते आहे. तसेच ज्यात तुमचा जास्त फंड जमा आहे. अशा परिस्थितीत बँकेला कोलेट्रल सिक्योरिटीची चिंता करण्याची गरज नाही.
ही कर्ज ऑफर मुख्यतः अशा लोकांसाठी उपलब्ध असते. ज्यांच्याकडे कर्ज चुकवल्याची कोणतीही हिस्ट्री नाही. यासह, त्याचे उत्पन्न चांगले आहे आणि ते नियमितपणे आयटीआर फाइल करतात.
प्री-अप्रूव्ड लोन आणि रेग्यूलर लोनमध्ये खूप फरक आहे. प्री-अप्रूव्ड लोनमध्ये, बँकेकडे ग्राहकांची सर्व माहिती आधीच असते. अशा परिस्थितीत हे कर्ज घेणे सोपे आहे. दुसरीकडे, नियमित कर्जामध्ये, तुम्हाला सर्व माहिती दिल्यानंतर कर्ज घ्यावे लागते.