या योजनेमध्ये अत्यंत कमी पैशात तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. यामध्ये तुम्ही 100 रुपये महिना एवढीही गुंतवणूक करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही आहे. तुम्हाला जमतील तेवढे पैसे या योजनेत गुंतवता येतील. पोस्ट ऑफिसचे आरडी डिपॉझिट अकाउंट उत्तम व्याजदर तर देतेच पण छोटे हप्ते असल्यामुळे ग्राहकांसाठी ही योजना सोयीची आहे. तसंच यामध्ये सरकारी गॅरंटी देखील आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये जे आरडी खाते उघडले जाते कमीत कमी 5 वर्षांसाठी असते. प्रत्येक तिमाहीला (वार्षिक दराने) जमा रकमेवर व्याज मोजले जाते. हे व्याज तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये चक्रवाढ व्याजासह (Compound Interest) जोडले जाते. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार आरडी योजनेवर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. 1 जुलै 2020 पासून हा नवा दर लागू करण्यात आला आहे.
जर तुम्ही वेळेत एखादा हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. आरडी योजनेत हप्ता भरण्यात उशिर झाल्यास प्रत्येक महिन्याला एक टक्के दंड द्यावा लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही सलग 4 हप्ते भरले नाहीत तर तुमचे खाते बंद होईल. मात्र हे खाते बंद झाल्यास 2 महिन्याच्या आतमध्ये ते पुन्हा सक्रीय करता येईल.