स्टॉक मार्केटमध्ये मल्टीबॅगर ठरलेल्या जिंदाल सॉ लिमिटेडच्या स्टॉक्सने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 300% पेक्षा जास्त रिटर्न दिलं आहे. हा शेअर 29 जून 2020 रोजी रु. 58.2 वर व्यवहार करत होता आणि आता त्याची सध्याची किंमत रु. 255 आहे. या कालावधीत 341% रिटर्न मिळाला. तर, तीन वर्षांत सेन्सेक्स केवळ 81.73% वाढला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जिंदाल सॉ लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात 200% पेक्षा जास्त रिटर्न दिलं आहे. शेअरने 260 रुपयांचा लाइफ टाइम उच्चांक गाठला आहे.
लोह आणि पोलाद उद्योग कंपनीच्या या स्टॉकने 1 वर्षात 222% रिटर्न दिला आहे आणि यावर्षी स्टॉक 134% वाढला आहे. गेल्या सत्रातील या कंपनीचे मार्केट कॅप 8212 कोटी रुपये आहे. 1 जुलै 2022 रोजी स्टॉकने 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 76.90 रुपये गाठली होती.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लीलाधरच्या वैशाली पारेख म्हणाल्या, "शेयर आधीच मजबूत तेजीच्या ट्रेंडमध्ये आहे. त्याने 246 रुपयांच्या वर ब्रेकआउट दिला आहे आणि 290 रुपयांच्या पातळीच्या पुढील लक्ष्याकडे वाटचाल करू शकते." त्यामुळे त्यात अल्प ते मध्यम मुदतीच्या कालावधीत गुंतवणूक राहू शकते."
गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत जिंदल सॉचा शुद्ध लाभ 178% वाढून 353.68 कोटी रुपये झाला आहे. जो मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत 126.93 कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीत विक्री 31% वाढून 5266 कोटी रुपये झाली. जी मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीच्या दरम्यान 4011 कोटी रुपये होती.
जिंदाल सॉ ही भारतातील उत्पादन सुविधांसह लोह आणि पोलाद पाईप्सची टॉपची उत्पादक आणि पुरवठादार आहे. Disclaimer: येथे नमूद केलेले स्टॉक ब्रोकरेज हाऊसच्या सल्ल्यावर आधारित आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम सर्टिफाइड इनव्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्या. तुमच्या नफा-तोट्यासाठी News18 जबाबदार राहणार नाही.