भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. यापैकी एक नियम सांगणार आहोत.
अनेकदा असे दिसून येते की, प्रवासासाठी लोक आधीच तिकीट बुक करतात. प्रवासाची वेळ जवळ आली की प्लानिंग बदलते आणि तिकीट रद्द करावे लागते.
तुम्ही रेल्वे तिकीट रद्द न करता प्रवासाची वेळ बदलू शकता. कन्फर्म तिकिटावर तुमच्या प्रवासाची तारीख बदलण्यासाठी, तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी आपलं तिकीट रिझर्वेशन काउंटरवर सरेंडर करावे लागेल.
तसेच तुम्हाला नवीन तारखेसाठी अर्ज करावा लागेल. येथे तुम्हाला क्लास अपग्रेड करण्याचा पर्याय देखील मिळेल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, तुमच्या प्रवासाची तारीख आणि क्लास दोन्ही बदलले जातील.
तारीख बदलण्यासाठी कोणतेही चार्ज आकारले जाणार नाही. मात्र, क्लास बदलल्यास त्या क्लासच्या भाड्याच्या आधारे पैसे आकारले जातात.
या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रवासाची तारीख बदलू शकता आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.