अनेकदा रिझर्वेशन केल्यानंतर प्रवाशांच्या प्लॅनमध्ये काही बदल होतात. अशा वेळी कन्फर्म तिकीट काढल्यानंतरही दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढण्याची सुविधा रेल्वे देते.
तुम्ही घरबसल्या तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. बोर्डिंग स्टेशन बदलल्यामुळे प्रवाशांचे तिकीट रद्द होत नाही किंवा रेल्वे तुमच्याकडून दंड आकारू शकत नाही.
हे करण्यासाठी, सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर तुम्ही तिकीट हिस्ट्री बुकिंगवर जा.
यानंतर, तुमचे नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा आणि नंतर Confirmation ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर बोर्डिंग स्टेशन चेंज होण्याचा मॅसेज येईल.