परमानेंट अकाउंट नंबर (PAN) आधारशी लिंक करण्याची डेडलाइन जवळ येतेय. इन्कम टॅक्स नियमांनुसार, प्रत्येक टॅक्सपेयरला आधारशी पॅन लिंक करणे अनिवार्य करण्यात आलेय. आता ही दोन कागदपत्रे जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. नॅशनल पेन्शन स्कीमच्या ग्राहकांसाठीही हे खूप महत्त्वाचे आहे.
पॅन इनअॅक्टिव्ह होऊ शकतो: सध्या, प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींनुसार पॅन वाटप केलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा आधार क्रमांक निर्धारित अथॉरिटीला कळवणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून आधार आणि पॅन लिंक करता येईल. हे निर्धारित तारखेला किंवा त्यापूर्वी करणे आवश्यक आहे, असे न केल्यास पॅन निष्क्रिय होईल.
NPS ट्रांझेक्शन अडकू शकतात: CBDT च्या नवीन परिपत्रकानुसार, PAN 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक न केल्यास ते निष्क्रिय होईल. PFRDA ने म्हटले आहे की, 'सर्व विद्यमान सदस्यांनी सुरळीत व्यवहारांसाठी 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. CBDT परिपत्रकानुसार असे न केल्यास एनपीएस खात्यांना नॉन-केवायसी अनुपालन मानले जाईल आणि पॅन आणि आधार लिंक होईपर्यंत एनपीएस ट्रांझेक्शन बंद केले जाऊ शकतात.