ICICI बँकेने 2 कोटी रुपयांवरील बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. बदलानंतर, बँक आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 4.75% ते 6.75% पर्यंत व्याजदर देतेय. एक वर्ष ते 15 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या डिपॉझिटवर आता कमाल 7.25% रिटर्न आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन बल्क एफडी रेट, 20 मे 2023 पासून लागू आहेत.
आजही एफडी हा सर्वात प्रसिद्ध गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. सध्या एफडीवरील व्याज पुन्हा वाढत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात सातत्याने वाढ होतेय. तसेच, FD मध्ये गुंतवणूक करणे हा सुरुवातीपासूनच सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे.
7 दिवस ते 29 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या डिपॉझिटवर, बँक 4.75% व्याज दर देतेय. 30 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतींवर, ICICI बँक 5.50% व्याज दर देतेय. ICICI बँक 46 दिवस ते 60 दिवसांच्या डिपॉझिटवर 5.75% आणि 61 दिवस ते 90 दिवसांच्या डिपॉझिटवर 6.00% व्याजदर देतेय.
91 दिवस ते 184 दिवसात परिपक्व होणाऱ्या डिपॉझिटवर आता 6.50% व्याजदर मिळेल. तर 185 दिवस ते 270 दिवसात मॅच्युअर होणाऱ्यांना 6.65% व्याजदर मिळेल. 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या बल्क डिपॉझिटवर, बँक 6.75% व्याज दर देतेय.
1 वर्ष ते 15 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्यावर ICICI बँक आता 7.25% व्याज दर देतेय. 15 महिने ते 2 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 7% आणि 2 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या डिपॉझिटवर 6.75% व्याजदर देत आहे.