रेल्वेच्या अनेक ट्रॅक असतात तेव्हा लोको पायटला कोणत्या ट्रेकवरुन जायचं हे कसं कळतं? तसंच आकाशात विमानाला गावांचा रस्ता कसा सापडतो? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर त्याची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक असल्यावर होम सिग्नलवरून कोणत्या दिशेने जायचे याची माहिती लोको पायलटला मिळते. हा सिग्नलच ट्रेनच्या ड्रायव्हरला सांगतो की, त्याला ट्रेन कोणत्या ट्रॅकवरुन गाडी घेऊन जायची आहे.
तसंच एवढ्या मोठ्या आकाशात विमानांना आपल्या निश्चित स्थळांचा रस्का कसा सापडतो? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तुम्हालाही पडला असेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATC विमानाच्या पायलटला कोणत्या दिशेला जायचे आणि कुठे जाऊ नये याची सूचना देते. पायलट जेव्हा विमान उडवतो तेव्हा त्याला रेडिओ आणि रडारच्या माध्यमातून त्या मार्गाची माहिती दिली जाते.
विमानाच्या पायलटला सूचना देण्यासाठी हॉरिजेंटल सिचुएशन इंडिकेटरचा वापर केला जातो. जे पाहून पायलट रुट सिलेक्ट करतो.