मार्केटमध्ये जुने फोन ऑनलाइन विकण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. परंतु, अनेकांना माहिती नाही की जुने फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातूनही विकले जाऊ शकतात.
फ्लिपकार्टवर जुने फोन विकण्याचा ऑप्शन अॅपमध्ये आहे. कंपनी Apple, Samsung, Realme, Motorola, Oppo आणि Vivo सारखे जवळजवळ सर्व ब्रँड अॅक्सेप्ट करते.
विशेष म्हणजे, येथे जुना फोन विकल्यावर घरून पिकअप केले जाते आणि पैसेही लगेच मिळतात. मात्र, सध्या भारतातील सर्व भागात ही सुविधा उपलब्ध नाही. यासाठी तुम्हाला तुमचा पिन कोड टाकून चेक करावं लागेल.
जुना फोन फ्लिपकार्टवर विकण्यासाठी तुम्हाला पहिले अॅप उघडावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरीमध्ये जाऊन फोनकॅशचा ऑप्शन शोधावा लागेल. त्यावर टॅप केल्यावर तुम्हाला Sell Your Phone चा ऑप्शन मिळेल.
त्यानंतर येथे तुम्हाला एका बॉक्समध्ये तुमच्या फोनचे नाव टाइप करून सर्च करावे लागेल. या ठिकाणी तुम्ही ब्रँडचा लोगो देखील निवडू शकता आणि त्यावरून डिव्हाइस पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनचा व्हेरिएंट सिलेक्ट करावा लागेल.
तुम्ही व्हेरिएंट सिलेक्ट करताच तुम्हाला स्क्रीनवर फोनची अंदाजे व्हॅल्यू दिसेल. पण, जर तुम्हाला फोनची खरी किंमत जाणून घ्यायची असेल. मग तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जसे की फोन किती जुना आहे. काही नुकसान वगैरे आहे का? ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही पिकअप ऑप्शनसाठी पुढे जाऊ शकता आणि तुमचा फोन सेल करु शकता.