कार्डचा पिन बनवताना लक्षात ठेवा की तो युनिक असावा आणि तुमच्या डेली लाइफमध्ये यूज होणाऱ्या पासवर्डशी जुळता कामा नये. म्हणजेच तुमचा फोन लॉक किंवा ईमेल पासवर्ड. 1234 किंवा 0000 सारख्या अनुक्रमांकांसारखे पासवर्ड कधीही ठेवू नका. असा पासवर्ड हॅक करणे खूप सोपे आहे.
पिन जेनरेट करण्यासाठी नेहमी रँडम सिक्वेंस निवडावा. पण हे करताना कोणाला याचा अंदाज लावता येणार नाही असं करा. पासवर्डमध्ये नेहमी संख्या आणि अक्षरांचा कॉम्प्लेक्स असावा.
तुमचा कार्ड पिन किंवा खाते पासवर्ड नेहमी मोठा ठेवा. असे पासवर्ड क्रॅक करणे हॅकर्ससाठी नेहमीच अवघड असते. हा पिन 6 ते 8 अंकांचा असावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, तुम्ही तुमचा पिन नियमित अंतराने बदलत राहिला पाहिजे. यामुळे तो अधिक सुरक्षित होईल.
ईमेल किंवा फोनवर फिशिंग कॉलसह तुमचे कार्ड डिटेल्स किंवा पिन कधीही शेअर करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, जर तुम्ही जास्त ट्रांझेक्शन करत असाल तर दर महिन्याला तुमचा पासवर्ड किंवा पिन बदला. अन्यथा 6 महिन्यांत बदलणे आवश्यक आहे.
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कार्डवर तुमचा पिन किंवा पासवर्ड कधीही लिहू नका. तो नेहमी लक्षात ठेवायला हवा. तुमचे कार्ड आणि पिन नेहमी सेफ ठेवायला हवे आणि कोणाशीही शेअर करू नये. बँकेच्या कर्मचाऱ्यासोबतही शेअर करु नका.
गर्दीच्या ठिकाणी असलेलं एटीएम वापरणं टाळा. अशा ठिकाणी तुमचा पिन सुरक्षित ठेवणे कठीण आहे. तुम्ही मोबाईल बँकिंग वापरत असाल, तर फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन यांसारखे फिचर्स अॅक्टिव्हेट ठेवावीत.