एअर कूलरमधील कूलिंग पॅडवर पाणी पोहोचवण्यासाठी वॉटर पंपचा वापर केला जातो. अनेकदा ते खराब होते आणि लोक ते फेकून देतात आणि नवीन खरेदी करतात. पण, भविष्यात तुमचा पाण्याचा पंप खराब झाला तर तुम्ही तो फेकून देऊ नका सोप्या ट्रिकने घरीच दुरुस्त करा.
सर्वात आधी, तुम्हाला पाण्याच्या पंपामागील कॅप उघडावी लागेल आणि कॉपर बायडिंगमध्ये लिकेज तर नाही ना हे चेक करावं लागेल. कारण, त्यात लीकेज असेल तर हे योग्य नाही. तुम्हाला फक्त असेच वॉटर पंप दुरुस्त करता येतील जे समोरच्या बाजूने कार्बन जमा झाल्याने किंवा दुसऱ्या कोणत्या समस्येमुळे बंद पडले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला समोरची कॅप उघडावी लागेल. यानंतर तुम्हाला एक छोटी मोटर दिसेल, तीही ओपन करावी लागेल.
आता यानंतर तुम्हाला शॉफ्टवर एक मॅग्नेट बसवलेले दिसेल. त्यात कार्बन जमा होतो आणि त्यामुळे पंप काम करत नाही. तुम्हाला ते सँड पेपरने स्वच्छ करावे लागेल आणि तुमचे काम विनामूल्य होईल.
याशिवाय, आता तुम्हाला मोटरचा शाफ्ट बाहेर काढावा लागेल. ते बाहेर काढल्यानंतर, तुम्हाला दिसेल की मोटारवरून फिरताना, शाफ्ट एका बाजूने बारीक झाला आहे आणि एका बाजूने जाड झाला आहे. अशा वेळी हे तुम्हाला बदलावं लागेल.
त्यासाठी सायकल रिपेअरिंगच्या दुकानात जाऊन त्यात वापरलेले स्पोक विकत घ्यावे लागतील. हे तुम्हाला फक्त 3 ते 5 रुपयात मिळेल. तुम्हाला ते जुन्या शाफ्टच्या आकारात कापून जुन्या शाफ्टच्या जागी ठेवावे लागेल. मग सर्व कॅप परत लावाव्या लागतील. फक्त एवढं करुनच तुमचा पंप चालू होईल.