उन्हाळा म्हटलं की, पंखा हा लागतोच. पंख्या शिवाय उन्हाळ्याची कल्पनाही करता येत नाही. पण बऱ्याचदा हळूहळू पंख्याचा वेग कमी होऊ लागतो. मग काय कडक उन्हाळ्यात पंखा वेगाने चालत नसेल तर मोठा प्रॉब्लम होतो. या अशा पंख्याची स्पीड कशी वाढवायची? याविषयीच आपण जाणून घेऊया.
पंख्याच्या ब्लेड्स स्वच्छ करा. यासाठी तुम्हाला आधी फॅन बंद करावा लागेल. नंतर ब्लेड पहिले कोरड्या कापड्याने आणि नंतर ओल्या कापडाने स्वच्छ करुन घ्या.
लक्षात ठेवा, आधी ओल्या कापडाचा वापर केल्यास सर्व धूळ फॅनच्या ब्लेडला चिकटते आणि पंखा व्यवस्थित साफ होऊ शकत नाही.
सहसा लोक पंखांचे ब्लेड स्वच्छ करतात. जर तुमचा पंखा गेल्या सीझनच्या तुलनेत खूप जास्त स्लो फिरत असेल, तर खरी समस्या कॅपेसिटरमध्ये असू शकते. कॅपेसिटर बदलून तुम्ही चांगली हवा मिळवू शकता. साधारणपणे कॅपेसिटर 70-80 रुपयांच्या दरम्यान येतो. यासाठी तुम्हाला घरी एका टेक्निशियनला बोलवावे लागेल, आणि त्याला कॅपेसिटर बदलून द्यायला सांगावे लागेल.
खरंतर कॅपेसिटर बदलणे इतके अवघड नाही. तुम्ही ते स्वतःही बदलू शकता. जुने काढताना फक्त त्याची स्थिती पोझिशन पाहा आणि त्यानुसार बदला. अशाप्रकारे, कॅपेसिटर बदलल्याने, पंख्याची स्पीड वाढेल आणि हवेचे सर्कुलेशन खोलीमध्ये वाढेल.