प्रोव्हिडेंट फंड नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सेविंगचा एक चांगला मार्ग असतो. EPFO चे सदस्य प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पीएफ फंडमधून अडव्हान्स पैसे काढू शकतात.
EPFO ने प्लॉट खरेदी, घर निर्मिती किंवा खरेदीसाठी पीएफ खात्यातून हाउस बिल्टिंग अडव्हान्स उपलब्ध आहे. हाउस बिल्डिंग अडव्हान्ससाठी EPF ची पाच वर्षांची सदस्यता असणं गरजेचं असतं. यासोबतच अकाउंटमध्ये व्याजासह कमीत कमी एक हजार रुपये असावेत.
प्लॉट खरेदीसाठी 24 महिन्यांचं वेतन डीएसह किंवा ईपीएफ खात्यात व्याजासह एकूण जमा राशी आणि प्लॉटचे वास्तविक मूल्य जो कमी असेल मिळू शकतो. हे अडव्हान्स घेण्यासाठी तुम्हाला Umang अॅप किंवा नंतर EPFO च्या वेबसाइटवर फॉर्म 31 भरावा लागेल.
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सॅलरीमधून 12 टक्क्यांची कपात ईपीएफ अकाउंटसाठी होते. एम्प्लॉयरकडून एम्पलॉयच्या सॅलरीमध्ये केलेल्या कपातीतील 8.33 टक्के ईपीएसमध्ये, तर 3.67 टक्के ईपीएफमध्ये जातात.