प्रत्येक तरुणाला शिक्षण झाल्यानंतर एका चांगल्या नोकरीची अपेक्षा असते. सर्वांना वाटतं की, त्यांना आपल्या फिल्डमध्ये ड्रीम जॉब मिळायला हवा. देश आणि जगात अशा कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सॅलरीसोबतच अनेक सुविधाही देते. यामध्ये 5 डेज वर्किंग, वर्क फ्रॉम होम आणि शिफ्ट टायमिंगमध्ये सूट यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा नोकरीबद्दल सांगणार आहोत जिथे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण, यासाठी तुम्हाला परदेशात जावे लागेल, कारण अनेक देशांमध्ये कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर खूप पैसा खर्च करतात. पगाराच्या बाबतीतही हे देश खूप पुढे आहेत. अमेरिकेत सरासरी वार्षिक पगार 63 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. यावरून तुम्हाला कल्पना येऊ शकते की तुम्ही कमी वेळेत इथे काम करून जास्त पैसे कसे कमवू शकता.
तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब जर्मनीमध्ये मिळू शकतो. कारण इथे एका वर्षात सरासरी 1349 तास काम करावे लागते. जर ते रोजच्या आधारावर मोजले तर ते 3.6 तास आहे. तर, डेन्मार्कमध्ये हा आकडा वार्षिक 1363 तास आणि रोजच्या 3.7 तासांचा आहे.
ब्राझीलमध्येही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना वार्षिक सरासरी 1481 तास काम करावे लागते. जे दररोजचे 4 तास इतके आहे. ब्रिटनमधील लोकांना वर्षातून केवळ 1497 तास काम करावे लागते आणि ते दिवसाला 4.1 तास इतके आहे.
सौदी अरेबियामध्ये वर्षाला सरासरी 15136 तास काम करावे लागते, जे दररोज 4.1 तास इतके आहे. जपानमधील कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 1607 तास काम करावे लागते, जे दररोज 4.4 तास असते.
जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेत प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 1791 तास म्हणजे दिवसाचे फक्त 5 तास काम करते. त्याच वेळी, मेक्सिकोमध्ये, वार्षिक सरासरी 2128 तास काम करावे लागते, जे दररोज 5.83 तास आहे.