गुडन्यूज! ऐन लग्नसराईत सोनं खरेदी करण्याची नामी संधी चालून आली आहे. सोन्याचे दर खाली घसरले आहेत. MCX वर सोनं सतत बदलत आहे. त्यामुळे ग्राहकांची धाकधूकही वाढली आहे. सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं.
2/ 7
अक्षय तृतीयेला पुन्हा सोनं महाग होण्याची शक्यता आहे. त्याआधी लग्नसराई असेल किंवा गुंतवणूक म्हणून सोनं घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी आहे.
3/ 7
995 शुद्धतेचं सोनं 57710 रुपयांना तोळा मिळत आहे. ९९९ शुद्धतेचं सोनं 58 हजार रुपयांना प्रति तोळा आहे.
4/ 7
RTGS आणि GST धरून 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम - ५९८०० तर २३ कॅरेट सोन्याचे दर ५९८०० रुपये आहे.
5/ 7
1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 5,968 तर 22 कॅरेट सोन्यासाठी 5,470 रुपये मोजावे लागणार आहेत.
6/ 7
मार्च 24 रोजी सोन्याचे दर 60 हजारांच्या वर गेले होते. त्यानंतर सलग चार दिवस सोन्याचे दर खाली आले आहेत. मात्र आता पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
7/ 7
सोमवारी 999 शुद्धतेचं 10 ग्रॅम सोनं घेण्यासाठी ग्राहकांना 59,690 रुपये असे दर होते. रविवारी सोन्याचा दर 59,840 रुपये होता.