Gold Silver Price Today: आज 25 जुलै 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.
सोन्याची किंमत 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा कमी आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 73 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,282 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 73889 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सोमवारी संध्याकाळी 59434 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59282 रुपयांवर आला आहे.
सोमवारी संध्याकाळी 999 शुद्धतेची चांदी 74622 होती. जी आज मंगळवारी सकाळी 74044 झाली आहे. म्हणजेच चांदी 578 रुपयांनी स्वस्त झाली आहे.