Gold Silver Price Today: आज 18 जुलैपासून अधिकमासास प्रारंभ झाला आहे. या महिन्यात जावयाला सोनं दिलं जातं. यामुळेच या काळात सोन्याची मागणी वाढते. दरम्यान आज 18 जुलै 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी महाग झाली आहे.
सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 75 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59330 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 75113 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 59270 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59330 रुपयांवर आला आहे.
सोमवारी 999 शुद्ध चांदीचा दर 75066 प्रतिकिलो होता. जो आज मंगळवारी सकाळी 75113 झालाय. म्हणजेच चांदी 47 रुपयांनी महाग झाली आहे.