लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा झालायं. चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँका सहजपणे लोन देतात. तसेच, यावर कमी व्याज आकारलं जातं. यासोबतच ज्यांचा स्कोअर लो असतो त्यांना लोन घेण्यात अडचणी येतात. तरीही कर्ज मिळालेच तरीही ते जास्त व्याजदरावर मिळतं.
क्रेडिट स्कोअर हा एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट योग्यतेचा सारांश असतो. यावरुन कळतं की, त्या व्यक्तीने त्याचे लोन आणि क्रेडिट कार्डचे ड्यूज जबाबदारीने मॅनेज केले आहेत की नाही हे कळतं. अनेक लोक नकळत काही चुका करतात. ज्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. चला अशा कॉमन चुकांविषयी जाणून घेऊया जे लोन घेणारे ग्राहक सामान्यतः करतात. या चुका भविष्यात हानी पोहोचवतात.
लोनचे हप्ते वेळेवर न भरल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरचे गंभीर नुकसान होते. EMI डिफॉल्ट्स तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये रेकॉर्ड केले जातात आणि वारंवार डीफॉल्टमुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरचे इतके नुकसान होते की ते दुरुस्त करणे खूप कठीण होते. म्हणूनच कर्जाचा हप्ता भरण्याची चूक करू नका.
काही लोक त्यांच्या क्रेडिट कार्डच्या लिमिटचा पुन्हा पुन्हा पुरेपूर वापर करतात. यामुळे क्रेडिट स्कोअरचे आरोग्य बिघडते. क्रेडिट लिमिटचा पूर्ण वापर केल्याने क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो. क्रेडिट स्कोअरिंग एजन्सी क्रेडिट युटिलायझेशन रेशो ठरवतात. यावरुन कार्डधारकांचे कर्ज घेणे किंवा उधार घेण्याविषयी माहिती मिळते. जो वारंवार क्रेडिट बॅलन्स झिरो करतो. अशा ग्राहकाची क्रेडिट लिमिट बँका कमी करतात.
काही लोक क्रेडिट कार्ड बंद करतात. ज्यावेळी त्यांना त्याची गरज वाटत नाही. क्रेडिट कार्ड बंद केल्याने क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत नाही, असा बहुतेकांचा समज आहे. पण असं होत नाही. ज्यावेळी तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करता तेव्हा तुमची ग्रॉस क्रेडिट लिमिट कमी होते. यासोबतच तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशोही वाढतो. हे तुमच्या क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचवू शकते.
आजकाल पर्सनल लोन सहज मिळतं. ज्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे त्यांना बँका हे कर्ज देतात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की खूप जास्त अन-सिक्योर्ड घेतल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरलाही हानी पोहोचते. त्यामुळे विनाकारण हे कर्ज घेऊ नका जेणेकरून गरज पडल्यास कर्ज घेण्यास अडचण येऊ नये.
क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा समावेश असतो. बरेच लोक हे चेक करत नाहीत. चुकीची माहिती टाकल्यावर क्रेडिट स्कोअर कमी होऊ लागतो. यामध्ये सर्वात जास्त चूक ही होते की री-पेमेंट योग्य प्रकारे नोंदवली जात नाही. म्हणूनच तुम्ही ते नियमितपणे चेक केलं पाहिजे आणि जर काही चुकीची माहिती भरली असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे.