तुम्ही जर चारधाम यात्रेला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. चारधाममधील स्थिती सध्या बिकट होत चालली आहे.
आजपासून चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन बुकिंग करायला सुरुवात झाली आहे. 25 एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराची कवाडं उघडणार आहेत.
तुम्ही जर चारधामला जाणार असाल तर तुम्हाला या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. चारधामला जाणाऱ्या रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत.
१० किमीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी रस्ता खचला आहे तर या भेगा देखील वाढत आहेत.
बद्रीनाथ धामची कवाडं 27 एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहेत. या प्रवासाला जाण्याआधी तिथली परिस्थिती काय आहे याचा अंदाज घ्या. नाहीतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.