मुंबई, 26 मार्च: उन्हाळा सुरु झाला आहे. तीव्र उन्हाळामुळे तापमनातही वाढ झालीये. यामुळेच आता थंड पदार्थांची मागणीही वाढलीये. अशा वेळी तुम्ही काही बिझनेस सुरु करण्याचा प्लान करत असाल तर एक अफलातून आयडिया आपण जाणून घेणार आहोत. हा व्यवसाय सुरु करुन तुम्ही चांगला नफा कमावू शकता. आज आपण आइस क्यूब बिझनेसविषयी बोलत आहोत.
जवळपास सर्वच ठिकाणी आइस क्यूबचा वापर केला जातोय. घरापासून तर ज्यूच्या दुकानापर्यंत आणि लग्नापासून ते पारपर्यंत आईस क्यूबची गरज पडते. येणाऱ्या भीषण उन्हाळ्यात याची मागणी वाढणार आहे. अशा वेळी हा बिझनेस तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. आइक क्यूबचा व्यवसाय सुरु करुन तुम्ही या सीझनमध्ये चांगला नफा कमावू शकता.
कसा सुरु करावा बिझनेस?: आईस क्यूबचा बिझनेस सुरु करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या बिझनेसला जवळच्या प्रशासकिय कार्यालयात रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे सुरु करण्यासाठी तुम्हाला एका फ्रीझरची गरज असेल. दुसरी गरज म्हणजे शुद्ध पाणी आणि वीज लागेल. तुम्ही हा फ्रिझर कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता. या फ्रीझरमध्ये विविध आकारचे आइस क्यूब तुम्ही तयार करु शकता. ज्यामुळे तुमच्या आईस क्यूबची बाजारात मागणी वाढेल.