तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाता. काही तांत्रिक बिघाडामुळे पैसे निघत नाही. पण बँक अकाऊंटमधून कापले जातात. मग तुम्ही केअर सेंटरला फोन करता. बँकेत खेटे मारता.
2/ 6
RBIच्या नियमाप्रमाणे बँकेला 7 दिवसांत ग्राहकांना पैसे परत द्यावे लागतात. तसं नाही झालं तर बँकेला ग्राहकांना दंड द्यावा लागतो.
3/ 6
सात दिवसांमध्ये पैसे बँकेत आले नाहीत तर बँकेला रोजचे 100 दिवस असा दंड द्यावा लागणार.
4/ 6
असं झालं की ताबडतोब तुम्हाला बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल. अधिकाऱ्यांना भेटावं लागेल.
5/ 6
30 दिवसांमध्ये काही कारवाई झाली नाही तर तुम्ही बँकिंग लोकपालला जाऊन भेटा.
6/ 6
तुम्हाला तक्रार दाखल करताना ट्रॅन्झॅक्शन रिसिट किंवा अकाऊंट स्टेटमेंट जोडावं लागेल. तुम्हाला एक फाॅर्मही भरावा लागेल. जेव्हा तुम्ही हा फाॅर्म भराल तेव्हापासून पेनल्टी सुरू होईल.