बँक व्यवस्थापनाने म्हटले की, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने माहिती दिली आहे की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने संपाची नोटीस जारी केली आहे. AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC सारख्या UFBU शी संलग्न संघटनांनीही संपाला पाठिंबा देण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम होणार आहे.
महिन्याच्या अखेरच्या 6 दिवसात 2 दिवस संप, 3 दिवस सुट्टी बँक व्यवस्थापनाने ग्राहकांना संपापूर्वी त्यांचे काम संपवण्यास सांगितले असले तरी 26 ते 31 जानेवारी दरम्यान ग्राहकांना त्यांचे काम संपवण्याची संधी 27 जानेवारीलाच मिळणार आहे. कारण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील बँकांच्या शाखा बंद होत्या. तर 28 जानेवारीला चौथा शनिवार सुट्टीचा दिवस आहे. यानंतर 29 जानेवारीलाही रविवारची सुट्टी आहे.
बँक युनियन संपावर का जात आहेत? पीटीआयच्या वृत्तानुसार, कामगार संघटना पाच दिवसीय बँकिंग, पेंशन अपडेट करणे आणि सर्व कॅडरमधील लोकांची भरती यासह इतर मुद्द्यांवर मागणी करत आहेत. बँक युनियन त्यांच्या मागणीसाठी दबाव निर्माण करण्यासाठी संप पुकारत आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात बँक युनियन कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन करत असल्याचे अनेकदा लक्षात येते.