कृषी प्रधान असणाऱ्या भारतात भौगोलिक रचना, हवामान यानुसार पीक पद्धती वेगवेगळी आहे. परंतु, आधुनिक पद्धतीने काही शेतकरी थंड प्रदेशातील पिकेही दुष्काळी भागात घेऊ लागले आहेत.
2/ 10
अहमदनगरमधील प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ यांनी असाच एक प्रयोग केला आहे. नेवासा तालुक्यातील रामडोह या गावात चक्क हिमालयातील सफरचंदाची शेती केली आहे.
3/ 10
भारत गुंजाळ यांनी सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेश मधून मागवली आहेत. रोपे आणण्यासाठी त्यांना प्रति रोप 125 रुपये एवढा खर्च आला.
4/ 10
एक एकर जमिनीत त्यांनी सफरचंदाची लागवड केली. शेतात 375 सफरचंदाची रोपे लावली आहेत.
5/ 10
लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये संफरचंदाच्या झाडांना फळे लागली आहेत. सध्या एका झाडाला 70 ते 75 फळे आले आहेत.
6/ 10
बदलत्या काळानुसार सफरचंदाचे काही वाण हे 50 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानातही जगू शकतात. आता उन्ह आणि पक्षांनी फळाचे नुकसान करू नये म्हणून फळांना प्लास्टिक आच्छादन करण्याचे काम सुरू आहे.
7/ 10
सफरचंदाची लागवड करण्यासाठी सरासरी तापमान 21 ते 24 अंश असणे गरजेचे आहे. या पिकाला चांगली फुले आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे 100 ते 125 सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे.
8/ 10
अहमदनगरमधील ज्या भागात हे पीक घेतले जात आहे, तिथे वातावरण काही अंशी थंडच जाणवते. जायकवाडीच्या बॅक वॉटर हा पट्टा असल्याने वातावरणात गारवा असतो. येथील तापमान कमीत कमी 15° आणि जास्तीत जास्त 30° आहे.
9/ 10
भारत गुंजाळ यांनी जोखीम पत्करत आपल्या एक एकर शेत जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद शेती सुरू केली. जायकवाडीच्या कुशीत वसलेल्या रामडोह येथे सफरचंद लागवड शक्य असल्याचे या प्रयोगातून समोर आले आहे.
10/ 10
आता गुंजाळ यांचा सफरचंदाच्या शेतीचा नवखा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे.