advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Aeroplane Facts: विमानाला का लावलेले असतात एवढे लाइट्स? याचाही असतो वेगळा अर्थ, जाणून घ्या फॅक्ट्स

Aeroplane Facts: विमानाला का लावलेले असतात एवढे लाइट्स? याचाही असतो वेगळा अर्थ, जाणून घ्या फॅक्ट्स

Aeroplane Facts: रात्रीच्या वेळी तुम्हाला विमानाचे लाइट्स अधिक चांगल्या प्रकारे दिसत असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, विमानाला एवढे लाइट्स का असतात? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. प्रत्येक लाइटचा एक अर्थ असतो.

01
 Aeroplane Facts: तुम्ही कधी विमानात प्रवास केला असेल किंवा आकाशात उडणारे विमान पाहिले असेल, तर विमानाचे लाइट्स तुम्ही पाहिले असतीलच. विमान इतक्या उंचीवर आकाशात उडते की लाइट नसेल तर विमान आहे की नाही हे तुम्हाला कळणारही नाही. विमानाची ओळखचं त्याच्यावरील लाइट्सने होते.  या सिरीजमधून आपण या लाइटचे फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.

Aeroplane Facts: तुम्ही कधी विमानात प्रवास केला असेल किंवा आकाशात उडणारे विमान पाहिले असेल, तर विमानाचे लाइट्स तुम्ही पाहिले असतीलच. विमान इतक्या उंचीवर आकाशात उडते की लाइट नसेल तर विमान आहे की नाही हे तुम्हाला कळणारही नाही. विमानाची ओळखचं त्याच्यावरील लाइट्सने होते. विमानांची दुनिया या सिरीजमधून आपण या लाइटचे फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.

advertisement
02
रात्रीच्या वेळी तुम्ही विमानाचे लाइट्स अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकता. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, विमानाला असलेल्या इतक्या लाइट्सचं काम काय असतं. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

03
लोगो लाइट्स प्लेनच्या मागील बाजूस सरळ  उभ्या पंखावर किंवा फिनवर लावलेले असतात. त्यांचं काम फक्त एवढंच आहे की ते विमानाच्या कंपनीचं नाव दाखवू शकतील. जे त्या फिनवर लिहिलेलं असतं. विमानासाठी हा लाइट बसवणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक नाही, पण विमानाच्या मार्केटिंगसाठी हा लाइट आवश्यक आहे. या लाइटने विमान स्पष्ट दिसतं.

04
विंग म्हणजे प्लेचे पंख. विंग्सच्या इंस्पेक्शनसाठी वापरल्या जाणार्‍या लाइटला विंग इंस्पेक्शन लाइट म्हणतात. हा लाइट लाइटवर असतात. ज्यामुळे विंग्सची तपासणी करणं सोपं होतं. एअरलाइनचे ग्राउंड क्रू आणि देखभाल कर्मचार्‍यांना या लाईटद्वारे विंगवरील कोणतीही समस्या कळते.

05
हे लाइट्स अशा प्रकारे बनवले जातात की, ते विमानाला हवेत टक्कर होण्यापासून वाचवतात. हे दिवे विमानासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, विशेषत: विमानतळाजवळ जेथे एकाच वेळी अनेक विमाने आकाशात उडत असतात. हे लाइट्स विमानाच्या वर आणि खाली जोडलेले असतात. या लाइट्स रोटेटिंग लाइट्स किंवा रोटेटिंग बेकन असेही म्हणतात. पायलटने विमानाचे इंजिन सुरू करताच, हे लाइट लागणे आवश्यक आहे जेणेकरून जमिनीवरील कर्मचाऱ्यांना विमान सुरू झाल्याचे समजेल. त्याचप्रमाणे ज्यावेळी विमानात मेंटेनन्स किंवा ग्राउंड क्रू काही महत्त्वाचे काम करत असेल तेव्हा हा दिवा लावला जातो. जेव्हा विमान उभे असते आणि त्याचे इंजिन बंद असते तेव्हाच हा लाईट बंद होतो.

06
या लाइटचं कामही लाल अँटी कोलिजन लाइटप्रमाणे असतं. परंतु ते पंखांच्या अगदी शेवटी जोडलेले असतात किंवा ते विमानाच्या मागील बाजूस ठेवलेले असतात. हे लाइट इतके तेजस्वी आहेत की ते हवेत दूरवरून दिसू शकतात. हे दिवे फक्त हवेतच चालू असतात. जेव्हा विमान उतरते आणि त्याच्या जागी असते तेव्हा लाइट्स बंद केले जातात. हे असे केले जाते कारण हा प्रकाश इतका तेजस्वी आहे की त्यामुळे जमिनीवरील क्रूच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

07
पोझिशन लाइट्स देखील कोलिजन लाइटसारखे असतात आणि ते विमानाच्या पंखांच्या टोकावर देखील बसवले जातात परंतु त्यांचा रंग लाल आणि हिरवा असतो. लाल दिवा डाव्या पंखावर असतो आणि हिरवा दिवा उजव्या पंखावर असतो. विमानाच्या मागील भागावर एक पांढरा लाइट असतो. हे लाइट सर्वप्रथम विमानामध्ये वापरले जातात. या लाइटच्या सहाय्याने पायलट, टॉवर, ग्राउंड कंट्रोलर, ग्राउंड सपोर्ट यांना विमानाची स्थिती आणि दिशा कळते. ज्यावेळी दुसऱ्या विमानाच्या पायलटला हवेत दुरून पांढरा प्रकाश दिसतो तेव्हा त्याला समजते की दुसरे विमान त्याच्याच दिशेने जात आहे. जेव्हा पायलटला विमानासमोर हिरवे आणि लाल लाइट दिसतात तेव्हा त्याला समजते की विमान त्याच्या दिशेने येत आहे.

08
हे प्लेनवर नवीन प्रकारच्या लायटिंग सिस्टमचे लाइट्स आहेत. जे प्लेनला अधिक दृश्यमान करण्यासाठी बनवले गेले आहेत. या सिस्टम अंतर्गत, विमानाच्या पंखांच्या बाजूला आणि खालच्या भागाजवळ दोन्ही बाजूंना दोन लाइट ठेवले जातात. जे अल्टरनेट चालू बंद होतात. विमान लँड होते तेव्हा ते सुमारे 200 फूट उंचीवरून चालू केले जातात, जेणेकरून दुसर्‍या विमानाशी, पक्ष्याशी किंवा जमिनीशी होणारी टक्कर टाळता येईल.

09
कोणत्याही विमानातील सर्वात तेजस्वी प्रकाश म्हणजे लँडिंग लाइट असतो. हे विमानाच्या खालच्या भागात आणि पंखांच्या खालच्या भागात लावलेला असतो. त्यांचा बीम अगदी एका दिशेला असतो त्यामुळे जेव्हा विमान उडते किंवा उतरते तेव्हा ते रनवेवर प्रकाश टाकते. या लाइट्समध्ये 600 वॅट पॉवरचे अनेक बल्ब बसवले आहेत. म्हणूनच ते इतका तेजस्वी प्रकाश निर्माण करतात. विमान स्थिर असताना हे लाइट चालू केलं तर कोणतीही व्यक्ती तो प्रकाश सहन करु शकणार नाही. त्यांच्या डोळ्यांना ईजा होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :
  •  Aeroplane Facts: तुम्ही कधी विमानात प्रवास केला असेल किंवा आकाशात उडणारे विमान पाहिले असेल, तर विमानाचे लाइट्स तुम्ही पाहिले असतीलच. विमान इतक्या उंचीवर आकाशात उडते की लाइट नसेल तर विमान आहे की नाही हे तुम्हाला कळणारही नाही. विमानाची ओळखचं त्याच्यावरील लाइट्सने होते. <a href="https://lokmat.news18.com/tag/airplane/">विमानांची दुनिया</a> या सिरीजमधून आपण या लाइटचे फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES