मुंबई : देशभरात मुसळधार पावसानं थैमान घातलं असताना मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. मागच्या 24 तासात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. तर दुसरीकडे बळीराजाही चांगला पाऊस अजूनही न लागल्याने चिंतेत आहे.
आज कोकण विभाग आणि कोकणता हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नगर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि सोलापुरात मात्र पाऊल शेतकऱ्यांना अजूनही हुलकावणी देत आहे. तिथे खरी पावसाची गरज असूनही तिथे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
11 जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.