18-19 मेच्या दरम्यान मान्यून अंदमानमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सून केरळमध्ये उशिरा येईल अशी चर्चा होती. मात्र आता हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी माहिती दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याने आनंदाचं वातावरण आहे.
2/ 7
हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मान्सून 4 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होईल.१ जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा नाही. यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे.
3/ 7
पुढील आठवडाभर अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता नाही. यामध्ये अल निनो खो घालणार नाही अशी अपेक्षा आहे.
4/ 7
जर वातावरण नेहमी सारखं राहील तर मान्सूनच्या वाटेत कोणतीही अडचण येणार नाही. मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये आणि 25 जूनपर्यंत सगळीकडे साधारण पावसाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं आहे.
5/ 7
यंदा पाऊस सर्वसामन्य राहील, अति मुसळधार किंवा पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल असं सध्यातरी वाटत नाही.
6/ 7
यंदाच्या मान्सूनचा शेतीवर फारसा वाईट परिणाम होणार नाही. वायव्य भारतात, आत्तापर्यंत, सामान्यपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.
7/ 7
जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे. त्यात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत चार टक्के कमी किंवा जास्त होऊ शकतात.