येत्या 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज आहे आज पुणे रत्नागिरी आणि रायगडसह विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आज या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस बरसेल पुण्यात पुढील 4 दिवस सलग ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे मुंबईमध्येही पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे